लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: बंदुकीचा धाक दाखवून फर्गसन रस्त्यावरील वैशाली हॅाटेलचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी या हॅाटेलचे कुलमुख्यत्यारपत्र बंदुकीच्या धाकाने नावावर करून घेतल्याचा आरोप एका महिलेने पतीवर केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जून २०१८ ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आणखी वाचा-पुणे: कर्वेनगरमध्ये पीएमपी बसवर दगडफेक; चालकाला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिर्यादीचा पती विश्वजीत याने महिलेला धमकावून व दारु पाजून तिच्यावर अत्याचार केले. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हॉटेल वैशालीचे कुलमुख्यातरपत्र नावावर करुन घेतले. फिर्यादी महिलेच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या मोटारींची आरोपीने परस्पर विक्री केली, तसेच एक कोटी ७० लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या मोटारी आरोपी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड तपास करत आहेत.