पिंपरी : वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यासाठी औद्योगिक परिसरात सहा नवीन उपस्थानकांची उभारणी करावी. त्यांपैकी भोसरी एमआयडीसीत तीन, कुदळवाडी, तळवडे, सेक्टर सात येथे प्रत्येकी एक उपस्थानक उभारण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने महावितरणकडे केली आहे.

औद्योगिक परिसरातील वीजवितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी भोसरी विभागीय कार्यालय येथे कार्यकारी अभियंता अतुल देवकर, उपकार्यकारी अभियंता भोसरी शिवाजी चव्हाण, आकुर्डीचे उमेश कवडे यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड यांनी बैठक घेतली.

हेही वाचा – पिंपरी : आई-वडील, सासू-सासऱ्यांना सांभाळण्यास नकार देणाऱ्यांची नोकरी धोक्यात; काय आहे प्रकरण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरणच्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक विभागासाठी मंजूर झालेला विकास आराखडा कार्यान्वित करावा, नवीन विकास आराखड्यासाठी पाठपुरावा करावा, औद्योगिक परिसरासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे. विद्युतपुरवठा अचानक खंडित झाल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी सहा उपस्थानके उभारण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता महापालिकेने जागा द्यावी, असे बेलसरे यांनी सांगितले.