कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात दुचाकीस्वार तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. शहरात गेल्या दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. आसिफ खान (वय ३३, रा. कोंढवा खुर्द) याने या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- पुण्यातील लोहगाव परिसरात टोळक्याकडून गोळीबार; शहरात गोळीबाराची दुसरी घटना

खान याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. दुचाकीस्वार खान आणि त्याचे मित्र शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बोपदेव घाटातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी खान याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. खान याच्यावर झालेल्या गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. जमीन खरेदी विक्री व्यवहार किंवा वैमनस्यातून खान याच्यावर गोळीबार झाल्याचा शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत.

हेही वाचा- पुणे महापालिकेच्या रुग्णालयांत विनामूल्य गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात गेल्या दोन दिवसांत गोळीबाराच्या तीन घडल्या आहेत. कोरेगाव पार्क भागात पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. लोहगाव भागात टोळक्याने दहशत माजवून शुक्रवारी रात्री पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली.