पुणे : बालरंगभूमी परिषदेच्या वतीने २० ते २२ डिसेंबर या कालावधीत पुण्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे पहिले बालरंगभूमी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ. मोहन आगाशे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेते सयाजी शिंदे, अजित भुरे, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, सविता मालपेकर, सुबोध भावे यांच्यासह नाट्य व बालनाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या समारोप प्रसंगी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिभा मतकरी यांना बालरंगभुूमी परिषद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. मोहन आगाशे, सचिन पिळगावकर, मोहन जोशी, गंगाराम गव्हाणकर, प्रियदर्शनी इंदुलकर, गणेश मतकरी, ऋजुता देशमुख यांच्या उपस्थितीत डाॅ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, पद्मश्री परशुराम गंगावणे, उदय देशपांडे, मेघना एरंडे, शैलेश दातार यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेत्री ॲड नीलम शिर्के-सामंत यांनी शनिवारी दिली.

हेही वाचा : पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास शिक्षा, सहा महिने कारावास आणि वीस लाख रुपयांचा दंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या बालरंगभूमी संमेलनात बाल कलावंताचे सादरीकरण, महाराष्ट्राभर नावाजलेल्या बालनाट्यांचे प्रयोग, लोककलेचे कार्यक्रम, अपंगांसाठी कार्यरत विविध संस्थांच्या बालकलावंतांचे गायन-वादन-नृत्य यांसह एकपात्री, नाट्यछटा, जादूगार, बोलक्या बाहुल्यांचे खेळ, पपेट शो, नाटुकल्या, ग्रिप्स थिएटर हे कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने कलादालनाची निर्मिती करण्यात येणार असून यात चित्र, शिल्प, रांगोळी, हस्तकला, मुखवटे यांचे प्रदर्शन तसेच प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.

नीलम शिर्के-सामंत, अध्यक्ष, बालरंगभमी परिषद