लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ढोले पाटील रस्ता परिसरात अतिक्रम विभागातील अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश रतनसिंग परदेशी (वय ४०), रोहित सुपरसिंग परदेशी (वय २५), रोहन सुपरसिंग परदेशी (वय २५), महेशसिंग उर्फ लखन जतनसिंग परदेशी (वय ३३) आणि सूरज सुपरसिंग परदेशी (वय २७, सर्व रा. केनेडी रस्ता, बंडगार्डन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महापालिकेचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. ढोले पाटील रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अतिक्रमण विभागाचे पथक कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला चढवला. लोखंडी झाऱ्याने पथकातील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.

हेही वाचा… पिंपरी: दुचाकी चोरणारा सराईत जेरबंद; ११ दुचाकी केल्या जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्याविरुद्ध मारहाणीचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने पाच जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.