शिरुर : मागील काही दिवसात शिरुर तालुक्यातून २ युवती व २ विवाहित महिला व एक पुरुष असे पाच जण चार गावातून बेपत्ता झाले आहेत .कवठे येमाई येथुन १९ वर्षाची युवती कपडे शिवण्यासाठी जाते म्हणून घरातून गेली ती अद्याप पर्यत घरी आली नाही .या तरुणीचा रंग सावळा असून कानामध्ये कर्णफुले , गळ्यामध्ये चैन , आहे .

वडनेर येथून १९ वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे . रंग गोरा असून कानात कर्णफुले , नाकात मुरली व डाव्या हाताच्या बोटात चांदीची अंगठी व गळ्यात चांदीची अंगठी आहे .पिवळ्या रंगाचा टॉप व पांढरे लेगीन घातलेले असून मोबाईल सह बेपत्ता झाल्या आहेत . तांदळी येथून ३५ वर्षाची महिला दुकानातून जाउन येते म्हणून घरातून बाहेर पडल्या त्या अद्याप पर्यत घरी पोहोचल्या नाहीत . त्या निमगोरा व सडपातळ आहेत .गळ्यात मणी मंगल सूत्र आहे काळ्या रंगाचे ब्लाउज व साडी आहे .

निमोणे येथील कु -हाडवाडीतून २४ वर्षीय महिला कोण्यास काही न सांगता बेपत्ता झाली आहे. त्यांच्या रंग सावळा असून कानात कर्णफुले , गळ्यात मंगलसूत्र ,लाल रंगाची साडी व निळा ब्लाउज असून डाव्या हाताला इंग्रजी एस असे गोंदलेले आहे .तांदळी येथून ४६ वर्षाचा पुरुष घरातून कोण्याला न सांगता निघुन गेल्याची घटना घडली आहे. त्याच्या अंगावर आकाशी रंगाचा शर्ट असून पांढरा रंगाची पॅंन्ट आहे रंग सावळा आहे . या पाच ही प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली केला जात आहे .