लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वडगाव शेरी बाजारपेठेत शनिवारी दुपारी पाच दुकानांना आग लागली. आगीत किराणा माल, तसेच खाद्य पदार्थ विक्री दुकाने जळाली. आगीत दुकानातील साहित्य भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

वडगाव शेरीतील मतेनगर भागात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास दुकानांना आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

आणखी वाचा-सिंहगडाजवळ सांबारेवाडीतील हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आग लागल्यानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली. वडगाव शेरीतील मतेनगर परिसरात असलेल्या बाजारपेठेत काहींनी खाद्यपदार्थांचे स्टॉल टाकले आहेत. आग लागल्यानंतर परिसरात घबराट उडाली. यापूर्वी या भागात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. आग लागण्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमनअधिकाऱ्यांनी व्यक्त केली.