माजी मध्यमगती गोलंदाज आणि मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद नामदेव मोहोळ (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांचे पुत्र तर, भाऊसाहेब मोहोळ आणि माजी खासदार अशोक मोहोळ यांचे बंधू होत. मोहोळ यांच्या पार्थिवावर रविवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहोळ यांनी १९६० ते १९७१ या कालखंडात क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द घडविली. उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या मोहोळ यांचा १९७६ मध्ये इंग्लंड दौऱ्यामध्ये समावेश झाला होता. मात्र, तो काळ फिरकी गोलंदाजांचा असल्याने त्यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकली नव्हती. 
मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील गरजू मुला-मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कार्य केले. ‘पूना एक्झिबिटर्स असोसिएशन’ या एकपडदा चित्रपटगृह मालक-चालक संघटनेचे अध्यक्षपद मोहोळ यांनी भूषविले होते. एकपडदा चित्रपटगृह चालकांना व्यवसाय बदल करण्याची परवानगी मिळण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावेत या मागणीसाठी त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former medium pacer sadanand mohol passed away pune print news amy
First published on: 31-07-2022 at 20:53 IST