मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नव्या सरकारचा मंत्री मंडळ विस्तार पार पडला. त्यानंतर आज पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम झाला.त्या दोन्ही कार्यक्रमानंतर पुण्यातील वडगावशेरी भागातील प्रभाग क्रमांक 1 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे,शहराध्यक्ष जगदिश मुळीक,खासदार गिरीश बापट,आमदार भीमराव तापकीर,माजी महापौर मुरलीधर मोहोळ, योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी रेखा टिंगरे म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टी ही लोकाभिमुख कामातून विकास करते. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच पुढील काळात भारतीय जनता पार्टीची विचारधारा घेऊन काम करणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.