scorecardresearch

Premium

पिंपरीत जेष्ठ व्यवसायिकाला लुटणाऱ्या चौघांना बेड्या; मिर्चीपूड टाकून लुटले होते २७ लाख

पिंपरी- चिंचवडमध्ये जेष्ठ व्यवसायिकाच्या तोंडावर मिर्चीपूड फेकून मनी ट्रान्सफरचे २७ लाख २५ हजार रुपये घेऊन पसार झालेल्या चार जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

four arrested for robbing senior businessman in Pimpri
अद्याप एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत (फोटो- लोकसत्ता टीम)

पिंपरी- चिंचवड : येथील जेष्ठ व्यवसायिकाच्या तोंडावर मिर्चीपूड फेकून मनी ट्रान्सफरचे २७ लाख २५ हजार रुपये घेऊन पसार झालेल्या चार जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजार रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी व्यवसायिक प्रकाश भिकचंद लोढा यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

विशाल साहेबराव जगताप, जावेद अकबर काझी, अभिषेक दयानंद बोडके आणि धिरेंद्रसिंग असवानी सिंग यांना पोलिसांनी अटक केली असून लालबाबू बाजीलाल जयस्वाल हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

case has been registered against the workers who obstructed the work of the cell company
पनवेल : सेल कंपनीचे काम रोखणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल
man and his son stabbed young man for a trivial reason
नागपुरात २१ दिवसांत १५ हत्याकांड! क्षुल्लक कारणावरून बापलेकाने युवकाला भोसकले
Controversy in Ambad
अतिक्रमित प्रार्थनास्थळ हटवल्याने अंबडमध्ये वाद
Extension of first phase of Mudrank Abhay Yojana Pune news
मुद्रांक अभय योजनेच्या पहिल्या टप्प्याला मुदतवाढ

आणखी वाचा-पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची पूर्व परीक्षा लांबणीवरच; २ ऐवजी आता १० डिसेंबरला परीक्षा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ व्यवसायिक प्रकाश लोढा यांना गेल्या आठवडयात रात्री पावणे आकाराच्या सुमारास लुटण्यात आले होते. त्यांच्या तोंडाला मिर्ची पावडर चोळून मनी ट्रान्सफर चे २७ लाख २५ हजार रुपये घेऊन आरोपी पसार झाले होते. लोढा हे तीन ठिकाणची मनी ट्रान्सफर ची एकूण रक्कम २७ लाख २५ हजार रोख रक्कम गोळा करून स्कुटर वरून राहते घरी दुर्गानगर येथे जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी स्कुटरला धक्का देऊन त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर टाकली आणि धक्का- बुक्की करत लाखोंची रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व युनिट आणि गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.

आणखी वाचा-रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ९३ महाविद्यालयांमध्ये साखळी रक्तदान शिबिरे

तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, दरोडा, खंडणी विरोधी पथक यांनी वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेत होते. अखेर खबऱ्या मार्फत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. चार ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजार रोख रक्कम हस्तगत केली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four arrested for robbing senior businessman in pimpri kjp 91 mrj

First published on: 29-11-2023 at 19:29 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×