पुण्याच्या मावळमध्ये शिरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे अधिक चौकशी पोलीस करत आहेत. प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी पक्षाचे असून काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत गोपाळे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली होती.

पुण्याच्या मावळमध्ये शिरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास अज्ञात तीन व्यक्तींनी कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. या घटनेमुळे मावळ परिसरात खळबळ माजली आहे. गोपाळे हे शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई बाबांच्या मंदिरासमोर दुचाकीवर बसले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर पाळत ठेवून अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे प्रवीण गोपाळे हे गंभीर जखमी झाले होते. ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. तेव्हा त्यांना काही अंतरावर गाठून त्यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारले गेले.

हेही वाचा – पुणे : कात्रजमध्ये कोयता गँगची दहशत; अल्पवयीन मुलांकडून एकावर कोयत्याने वार

हेही वाचा – पोटनिवडणुकीबाबत अद्याप पक्षामध्ये चर्चा नाही; जयंत पाटील यांची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मावळ परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने चार संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, नेमकं कारण तपासाअंति समोरील येईल. दरम्यान हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, अत्यंत क्रूरतेने प्रवीण गोपाळे यांची हत्या करण्यात आली.