पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी लोणावळ्याच्या राजमाची किल्ला परिसरातील ढाक बहिरी डोंगरावर मंगळवारी ट्रेकिंगसाठी गेले होते. दाट धुके आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चार जण दिशा भरकटले. रात्री उशिरा साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना शोधण्यात शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्य जीवनरक्षक टीमच्या सदस्यांना यश आला आहे. अंधार आणि धुकं या सह पावसामुळे शोध मोहिमेत अनेक अडथळे आले. चारही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शोधण्यात टीमला यश आले. चेतन कबाडे, अमोल मोरे, सुमित शेंडे आणि आदित्य सांगळे अशी चारही मित्रांची नावं आहेत.

हेही वाचा… पुणेकरांसाठी खुषखबर..! पहिल्याच पावसात धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

पुणे शहरातील नामांकित कॉलेजचे चार विद्यार्थी लोणावळ्यातील ढाक बहिरी येथे डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मावळ आणि लोणावळा परिसरात पाऊस कोसळत आहे. दाट धुके आणि सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चार तरुण घनदाट जंगलात दिशा भरकटले. सायंकाळी दिशा भरकटलेले तरुण रात्री उशिरापर्यंत मदतीच्या अपेक्षेने एकाच ठिकाणी थांबून होते. अखेर, लोणावळा शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्य जीव रक्षक, कामशेत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांच्याशी संपर्क केला. रात्री दहा साडेदहा वाजता शोधमोहीम सुरू झाली. सतत कोसळत असलेला पाऊस, घनदाट झाडी आणि अंधार यामुळे शोधकार्यात अनेक अडथळे येत होते. तरुणांच्या मोबाईल ला नेटवर्क असल्याने त्यांच्याशी अधूनमधून संपर्क व्हायचा. घनदाट जंगल, अंधार, हिंस्त्र प्राण्यांच्या आवाजामुळे तरुण भयभीत झाले होते.

हेही वाचा… हेही वाचा… पुण्याच्या उपनगरांतील वारसास्थळांसाठी आता ‘हेरिटेज वाॅक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर तीन ते साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना शोधण्यात शिवदुर्ग मित्र, मावळ वन्य जीवरक्षकच्या टीमला यश आले. रात्री दीडच्या सुमारास त्यांचा शोध यशस्वीपणे घेतला. तरुण अत्यंत भीतीच्या सावटाखाली होते. पावसाळा सुरू असल्याने लोणावळ्यात दररोज शेकडो पर्यटक येतात. तसेच, ट्रॅकिंगसाठी धाडस करतात. परिसराची माहिती असेल तरच असे धाडस करावे असे आवाहन शिवदुर्ग चे सुनील गायकवाड यांनी तरुणांना आणि पर्यटकांना केले आहे.