पुणे : गणेशोत्सव, दहीहंडी आदी सणांपूर्वी मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरातील मेट्रोचे काम पूर्ण करावे, अशी मागणी काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. मेट्रोचे सर्व काम एक ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली.

 शहरातील मानाचे पाच गणपती मंडळांचे प्रमुख आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी यांच्याबरोबर आमदार रवींद्र धंगेकर यांनी टिळक पुतळा ते मंडई या दरम्याच्या कामाची पाहणी मंगळवारी केली. या पाहणी दौऱ्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी ही मागणी केली. महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे, बाळासाहेब मारणे, प्रवीण परदेशी, महेश सूर्यवंशी, भोळा वांजळे, विकास पवार, प्रसाद कुलकर्णी, सुरेश कांबळे यावेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

  मध्यवर्ती भागातील गणेश मंडळे, छोटे व्यापारी आणि अन्य घटकांना मेट्रोच्या कामामुळे भेडसावत असलेल्या अडचणींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने कोणत्या ठोस उपाययोजना करता येतील आणि कोणत्या उपाययोजना प्राधान्य क्रमाने कराव्या लागतील, याचे कालबद्ध वेळापत्रक या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली.