पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहरातील हिंजवडी आणि वाकड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य व्यक्तींना आणि कामगारांना लुटणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आले असून तीन कोयते देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. प्रमोद दयानंद कांबळे वय- २१, प्रफुल्ल राजू वाघमारे वय-२१, पवन शहादेव जाधव वय- २१, रोहित उर्फ बॉण्ड राहुल शिंदे वय- १९ आणि राहुल कॅप्टन मोरे वय- २० अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी- चिंचवडमध्ये सर्वसामान्य आणि कामगार यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून तीन कोयते आणि दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही टोळी मध्यरात्री रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या किंवा चालत जाणाऱ्या व्यक्तीला अडवून मौल्यवान ऐवज, पैसे घेऊन मारहाण करायचे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. यामुळे त्या टोळीची दहशत निर्माण होत होती.

आणखी वाचा- पिंपरी: तळेगाव दाभाडे पोलिसांकडून पत्रकारांना नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, लुटमार करतानाचा व्हिडीओ समोर आला असून ही टोळी दुचाकी चालकाला लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस गणेश जवादवाड यांच्या टीमने केली आहे.