पुणे : पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून सात लाख ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विकी कृष्णा माने (वय १९), राज कृष्णा माने (वय २३), कृष्णा रमेश माने (वय ४४, तिघे रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा), सुधीर नागनाथ जाधव (वय ४६, रा. शास्त्रीनगर, अंबरनाथ, जि. ठाणे), संतोष शरणप्पा जाधव (वय ४०, रा. घुलेनगर, मांजरी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

हेही वाचा – सावधान! पुण्यात बोगस औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडून तीन विक्रेत्यांवर कारवाई

पीएमपी प्रवासी महिलांकडील सोन्याच्या बांगड्या कटरचा वापर करुन चोरून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत, तसेच प्रवासी महिलांच्या पिशवीतून दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. येरवडा, फरासखाना पोलीस ठाण्यात प्रवासी महिलांकडील दागिने चोरीला जाण्याचे गुन्हे दाखल झाले होते. फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथक चोरट्यांचा शोध घेत होते. कसबा पेठेतील सूर्या हाॅस्पिटलसमोर असलेल्या पीएमपी थांब्यावर चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी गजानन सोनूने आणि प्रवीण पासलकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना पकडले.

हेही वाचा – अवयव प्रत्यारोपण आता अगदी कमी खर्चात! खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांना ससूनचा स्वस्त पर्याय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींकडून सोन्याचे दागिने, कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी चार गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मेहबूब मोकाशी, गजानन साेनूने, नितीन तेलंगे, महेश राठोड, संदीप कांबळे, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, समीर माळवदकर यांनी ही कारवाई केली.