लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : स्मार्टसिटी प्रकल्पातील अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या आणि दुचाकी चोरणाऱ्या टोळीस पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पिंपरीत करण्यात आली.

ओंकार सुरेश पवार (वय १८, रा. मिलींदनगर, पिंपरी), जफर जैद सिद्धीकी (वय २०, रा. संजय गांधीनगर पिंपरी), गणेश भुंगा कांबळे (रा. निराधारनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांना अटक केली आहे. तर, त्यांच्या अल्पवयीन तीन साथीदारांना ताब्यात घेतले.

आणखी वाचा-प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल आता दुपारीही धावणार

पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्टसिटी योजनेतून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात जाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी लावण्यात आलेल्या जंक्शन बॉक्समधील एच. बी एल कंपनीच्या १०० एच ए पॉवरच्या बॅटऱ्या या मागील काही महिन्यापासून चोरीस जात होत्या. त्यामुळे महत्वाच्या वर्दळीच्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पोलीस बॅटऱ्या चोरणाऱ्याचा शोध घेत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना निराधारनगर झोपडपट्टीलगतच्या मोकळ्या पडिक जागेमध्ये आरोपी दुचाकीवरून आणलेल्या बॅटऱ्या कोळशाच्या पोत्यांखाली लपवून ठेवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. सांगवी व निगडी परिसरातून सीसीटीव्ही जंक्शन मधील बॅटऱ्या आणि दुचाकी चोरल्याची कबुली आरोपींनी दिली.