पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यावरील सट्टेबाजीत हरलेले सहा लाख रुपये परत न केल्याने सट्टेबाजांनी पुण्यातील एका गॅरेजचालकाचे अपहरण केले. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सट्टेबाजांना सोलापूरमधून अटक केली. नागेश एलमल्ली, आकाश बिराजदार (दोघे रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे गॅरेज आहे. पती आयपीएल क्रिकेट सामन्यावरील सट्टेबाजीत सहा लाख रुपये हरला होता. सट्टेबाज एलमल्ली, बिराजदारने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. सट्टेबाजांनी शनिवारी पहाटे व्यावसायिकाचे मोटारीतून अपहरण केले. सट्टेबाजीत हरलेले सहा लाख रुपये परत न केल्यास सोडणार नाही, अशी धमकी दोघांनी त्याला दिली.

हेही वाचा – पुणे: संभाजी भिडेंसह १५० जणांविरुद्ध गुन्हा; परवानगी नाकारल्यानंतरही सभा

हेही वाचा – …अन पिंपरी महापालिकेला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सट्टेबाजांनी महिलेकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपासात गॅरेजचालकाचे अपहरण करुन त्याला सोलापूरमध्ये डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक सोलापूरला रवाना झाले. पोलिसांनी गॅरेजचालकाची सट्टेबाजांच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी एलमल्ली, बिराजदार यांना अटक करण्यात आली आहे.