घाऊक बाजारात हिरवी मिरची, ढोबळी मिरची, काकडी, पापडी, वालवरच्या दरात घट झाली. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत लसणाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१० सप्टेंबर) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

हेही वाचा >>> अग्निशमन दलातील अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूसाठी कुटुंबीयांना ८४ लाखांची नुकसान भरपाई

गेल्या आठवड्यात १२५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. कर्नाटकमधून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो घेवडा, इंदूरमधून १२ ते १३ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ५ ते ६ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ५० ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली. पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो बारा ते तेरा हजार पेटी, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, पुरंदर, वाई, सातारा भागातून मटार ५ ते ६ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंग, १०० ते १२५ गोणी, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पाे, कांदा ८० ट्रक अशी आवक झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.