पुणे : कोंढव्यातील येवलेवाडीत एका गोदामास शुक्रवारी सकाळी आग लागली. गोदामातील साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.येवलेवाडीतील गोदामास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी दाखल झाले.
आग भडकल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आगीमागचे कारण समजू शकले नाही.कोंढवा येवलेवाडी, मंतरवाडी परिसरात गोदामे आहेत. गोदामांना आग लागण्याच्या घटना सातत्याने घडतात.
