महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारताबाबत सामान्य परिस्थितीत अगदी गल्लीतही भांडणं होतात, नेते मंडळी खूप भांडतात, असं निरिक्षण नोंदवलं. इतरवेळी धर्मावरून लढतील, पण संकट येताच सगळे एकत्र येतात, असंही यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी नमूद केलं. ते लोणावळा येथे करोना योद्ध्यांचा पुरस्कार देण्यात आला त्यावेळी बोलत होते. लोणावळ्यात स्वच्छता दूत आणि करोना योद्ध्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार्थींमध्ये सर्व धर्मियांचा समावेश होता.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “कोरोना काळात संपूर्ण देशात सर्वांनी एकत्र येत काम केलं आहे. हे आपल्या देशाच सौभाग्य आहे. सामान्य परिस्थिती असेल तर अगदी गल्लीतही भांडणं होतात. नेते मंडळी तर खूपच भांडतात. लोकशाही आहे. मात्र, देशावर पाकिस्तान, चीनमधून संकट येवो अथवा करोनासारखं संकट येताच सगळे एकत्र येतात आणि काम करतात.”

हेही वाचा : “कधीकधी पदावर बसलेल्या लोकांना सुद्धा…”, राज्यपालांच्या विधानावर शरद पवारांचं शरसंधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इतरवेळी धर्माच्या आणि इतर कारणांवरून लढतील, पण संकट येताच सगळे एकत्र येतात. ‘हम सब एक है’. यापुढे जाऊन आता आपण सगळे नेहमी एकत्र राहू असा प्रयत्न करायला हवा. जेणेकरून संकट येऊच नये. यासाठी आपण सर्वजण सजग राहिले तर लोणावळा एक आदर्श निर्माण करेल,” असंही राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलं.