सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी शहरात डबल डेकर बस सुरू कण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. शहरातील झाडांची उंची लक्षात घेऊन डबल डेकर बस सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाला केली आहे.

हेही वाचा- ऑनलाइन वीजबिले भरण्यात पुणेकर राज्यात प्रथम

पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. सर्व कामे कालमर्यादेत आणि गतीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, महापालिकेच्या सहआयुक्त तथा मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी उल्का कळसकर यावेळी उपस्थित होत्या. शहरात डेबल डेकर बस सुरू करण्याबाबतची चाचपणी पीएमपी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा पीएमपीच्या बैठकीत करण्यात आली आहे. मात्र अद्यापही डबल डेकर बस घेण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात मुंबईतील बेस्टबरोबर चर्चा करण्यात येईल. डबल डेकर बसाच्या उपयुक्ततेचा अभ्यास केल्यानंतर आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्याचे पीएमपी प्रशानसाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यातच शहरातील झाडांची उंची लक्षात घेऊन डबल डेकर बस सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी, अशी सूचना पाटील यांनी बैठकीत केली.

हेही वाचा– पुण्यातील ५६ लाख नागरिक वीजबिलाच्या रांगेतून बाहेर, तीन महिन्यांत तब्बल १३७५ कोटींचा ऑनलाइन भरणा

पायाभूत सुविधांची विकास कामे दर्जेदार होतील यावर विशेष लक्ष द्यावे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओइपी) होणारे परीक्षण (ऑडीट) योग्यरितीने होत असल्याची खात्री करुन अद्याप अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. सकाळच्या वेळेत उद्यानांमध्ये फिरायला आणि व्यायासामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न वाटावे यासाठी त्याठिकाणी मंद आवाजात संगीत लावावे, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘आप’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कडून राबण्यात येत असलेले संकल्पनाधिष्ठीत अर्थात थीम बेस्ड उपक्रम, ज्येष्ठ नागरिक पार्क, सायन्स पार्क, ऑगमेंटेड रियालिटी पार्क, शहरातील झाडांची देखभाल, वायफाय सुविधा, ईमर्जन्सी कॉलबॉक्स, स्मार्ट ई-बस, स्ट्रीट लाईट, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेची (अडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) कामे आदींच्या कामाचा आढावा घेण्यात आला.