लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस नारंगी इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांना पिवळा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासह, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा ते कोमोरीन भागावर असलेली वाऱ्यांची द्रोणिय रेषा आता विदर्भ ते उत्तर केरळपर्यंत निर्माण झाली आहे. ही रेषा मराठवाडा आणि कर्नाटकावरून जात आहे. प्रती चक्रवाताची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात बाष्पयुक्त वारे येऊन हवेत आद्रर्ता वाढली आहे.

आणखी वाचा- देशभरात पाणी टंचाईच्या झळा… सर्वाधिक भीषण टंचाई कुठे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील या हवामानच्या स्थितीमुळे आज, सोमवारी गोंदिया, चंद्रपूरला तर उद्या, मंगळवारी अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या ठिकाणी अवकाळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.