scorecardresearch

पुणे : गोवरचे रुग्ण शोधण्याचे आदेश; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून आढावा

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शहरातील आरोग्य व्यवस्था आणि सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला.

पुणे : गोवरचे रुग्ण शोधण्याचे आदेश; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून आढावा
(संग्रहित छायाचित्र)

दाट लोकवस्ती भागात सर्वेक्षण करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांना भेट देऊन गोवर आजाराच्या रुग्णांची माहिती घ्यावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी रविवारी शहरातील आरोग्य व्यवस्था आणि सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्यावेळी गोवर आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत त्यांनी चिंता व्यक्त करताना गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबाजावणी करण्याचे आदेश दिले. आमदार भीमराव तापकीर, आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्यासह आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : पार्सल पाठविण्यासाठी टपाल कार्यालयाची विशेष सेवा

गोवर आजाराबरोबरच जपानी मेंदुज्वर, झिका विषाणू आजाराचाही या बैठकीत आढाव घेण्यात आला. गोवर आजार आणि उपाययोजनांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. त्यादृष्टीने काही उपाययोजनाही डाॅ. तानाजी सावंत यांनी सुचविल्या. शहरातील दाट लोकवस्ती भागात जाऊन सर्वेक्षण करावे, खासगी रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांची माहिती घेणे, रुग्ण शोधमोहीम व्यापक करणे, महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गोवर आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लक्ष द्यावे, असे डाॅ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 09:57 IST

संबंधित बातम्या