वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विसर्जन हौदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का बसला. वीजेच्या धक्क्यामु़ळे संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाशेजारी गणपती विसर्जन हौदावर काम करत असताना सूरज रमेश खुडे हा कंत्राटी कामगार हातातील वायर फेकत असताना हाय टेन्शन तारेला या वायरचा स्पर्श झाला. त्या विजेचा स्फोट होऊन खुडे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे सुविधा नसल्याने ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>> वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विसर्जन हौदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का बसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान,  कर्तव्य बजावत असताना कंत्राटी कामगारांना अचानक अपघात होऊन गंभीररित्या जखमी झाल्यास कोणताही संबंधित कंत्राटदार जबाबदारी घेत नाहीत. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने कंत्राटी कामगारांना इएसआयसीचे ओळखपत्र त्वरित देण्याची मागणी वारंवार करून देखील संपूर्ण कंत्राटी कामगारांना ते देण्यात आलेले नाही. अपघात झालेल्या कंत्राटी कामगारांना महानगरपालिकेने मोफत उपचार करण्याची जबाबदारी घ्यावी, असे निवेदन महापालिका आयुक्तांना लेखी स्वरूपात दिलेली आहे तरी संबंधित मागणीला महानगरपालिकेच्या प्रशासनाने अद्यापपर्यंत मान्यता दिलेली नाही. असे कामगार युनियनचे चिटणीस वैजीनाथ गायकवाड यांनी सांगितले.