पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पानशेत धरण ९२ टक्के भरले असून उर्वरित तिन्ही धरणातही समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.

सध्या धरणांमधील पाणीसाठा २४.२९ अब्ज घनफूट (टीएमसी) ८३.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १६० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १०० मि.मी, पानशेत धरण परिसरात ९० मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १४ मि.मी. पाऊस पडला. मंगळवारी रात्री चारही धरणांत २३.०८ टीएमसी पाणीसाठा होता. मंगळवारी रात्रीच्या तुलनेत बुधवारी सकाळी तब्बल १.२१ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चारही धरणांत पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे या धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. आतापर्यंत या धरणातून ३.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत

टेमघर                   २.५०      ६७.४४

वरसगाव               १०.८३    ८४.५१

पानशेत                 ९.८८      ९२.७८

खडकवासला        १.०७      ५४.४१

एकूण                   २४.२९    ८३.३२