लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: चित्रीकरणासाठी निघालेल्या चौघा सहकलाकारांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्यात आल्याची घटना बी. टी. कवडे रस्त्यावर घडली.
याबाबत इम्रान खान (वय २१, रा. सय्यदनगर, महंमदवाडी रस्ता, हडपसर) याने या संदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

इम्रान खान हिंदी चित्रपटात सहकलाकार आहे. खान आणि त्याचे सहकारी हर्ष नाथे, जिशान पटणी चित्रीकरणासाठी मुंबईला निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास ते बी. टी. कवडे रस्त्यावर बसची वाट पाहत थांबले होते. तेथील एका टपरीवर ते चहा प्यायला थांबले होते. त्या वेळी एक जण तेथे आला. त्याच्याबरोबर साथीदारही होते.

हेही वाचा… पुणे: सहायक पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खान, नाथे, पटणी यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. चोरट्यांनी त्याच्या खिशातील रोकड काढून घेण्याचा प्रयत्न केला. खान याचे सहकारी नाथे आणि पटणी यांना मारहाण करुन त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल संच हिसकावून चोरटे अंधारात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.