पुणे : आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याच्या तयारीत असल्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. मात्र गृहपाठ बंद करण्याचे हे माझे व्यक्‍तिगत मत आहे. शिक्षक संघटना, संस्थाचालक आदी घटकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा <<< पाषाण-सूस उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाहतूक कोंडी टळण्याची शक्यता; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

हेही वाचा <<< व्यावसायिकाला दोन महिलांकडून अडीच लाखाला गंडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ येथे केसरकर यांनी शुक्रवारी शिक्षण विभागाचा आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल असे शिकवले पाहिजे. जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही,’ असे सांगत पुढील शैक्षणिक वर्षापासून गृहपाठ बंद करण्यात येण्याचे सुतोवाच त्यांनी केले. गृहपाठ बंद करण्याबाबत शिक्षण क्षेत्रातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.