केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई बोर्ड) बारावीचा निकाल सोमवारी (२७ मे) जाहीर होणार आहे. दहावीचे चेन्नई विभागाचे निकाल रविवारी जाहीर करण्यात आले असून संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
बारावीचे निकाल सोमवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहेत. संकेतस्थळावर आणि एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहेत.  http://www.cbse.nic.in, http://www.cbseresults.nic.in आणि http://www.results.nic.in   या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहेत. एसएमएसच्या माध्यमातून निकाल मिळवण्यासाठी सीबीएसई १२ आणि बैठक क्रमांक टाईप करून एसएमएस पाठवायचा आहे. बीएसएनएल धारकांना ५७७६६ या क्रमांकावर, एअरटेल धारकांना ५२०७०११ या क्रमांकावर, एअरसेल धारकांना ५८००००१ या क्रमांकावर तर व्होडाफोन धारकांना ५०००० या क्रमांकावर निकाल मिळणार आहे.
—————–