गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह पोलिसांची दमछाक

पर्यटनस्थळ लोणावळ्यात विकेंडनिमित्त मोठी गर्दी झाली होती. सर्वांच्या आवडीचं ठिकाण असलेल्या भुशी धरणावर देखील पर्यटक आल्याने गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळालं. त्याचबरोबर टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी धुक्याची चादर पसरली होती. टायगर आणि लायन्स पॉईंट धुक्यात हरवून गेलं होतं. महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले होते. लोणावळ्यात वीकेंडला हमखास पर्यटकांची गर्दी होते.

हेही वाचा >>> “शिंदेंच्या गटाचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, उलट त्यांचं….”, विनायक राऊतांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज रविवार असल्याने अनेकांनी सुट्टीचा मुहूर्त पाहून लोणावळ्यात गर्दी केली होती. लोणावळ्यातील सर्वांच्या आवडीचं ठिकाण भुशी धरणावर देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले होते. त्याचबरोबर लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी देखील पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद घेतला. यावेळी लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट हे धुक्यात हरवल्याचं बघायला मिळालं. वीकेंड असल्याने पुणे, मुंबई यासह इतर शहरातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉइंटच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. लोणावळा शहर पोलीस ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सोडवताना दिसले. वीकेंडच्या दिवशी लोणावळा शहर पोलिसांची मात्र दमछाक होते, हे मात्र तितकच खरं.