लोणावळा : लोणावळा शहर परिसरात रविवारी पर्यटकांची गर्दी झाली. पुणे-मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातील पर्यटक मोठ्या संख्येने वाहनातून दाखल झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. लोणावळा शहरातील रस्ते, तसेच भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा >>> पावसामुळे फळभाज्यांची आवक घटली, टोमॅटो, लसूणचे दर तेजीत

वर्षाविहारासाठी शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरात कोंडी होत असून वाहतूक कोंडी, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले आहे. वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन दिला आहे. लोणावळ्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी स्वयंसेवकांची मदत घेतली. रविवारी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. पोलीस आणि स्वयंसेवकांनी वाहतूक नियोजन केल्याने कोंडी सुटण्यास मदत झाली. मात्र, मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून दाखल झाल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला. त्यामुळे लाेणावळ्यातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, तसेच भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी पर्यटकांना रस्त्यात मोटारी न थांबविण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> विमानतळे, मेट्रो स्टेशन, इमारतींच्या बांधकामात आता बांबूचा वापर; केंद्राच्या बांबू प्रचार आणि लागवड सदस्य पाशा पटेल यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली, तसेच एकबाजुची वाहतूक बंद करुन वाहने टप्याटप्याने सोडण्यात आली. शनिवारपासून लोणावळा शहरातून जाणारा जुना मुंबई-पुणे महामार्ग, भुशी धरण, लायन्स पाॅईंटकडे रस्ता, भाजे लेणी, कार्ला लेणी, लोहगड किल्ला, पवनानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मळवली-भाजे रस्त्यावरील अतिक्रमणांवर पोलिसांनी कारवाई केली. कार्ला फाटा परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.