पिंपरी- चिंचवड: बावधनमध्ये पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला बावधन पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केलं आहे. मनीषा प्रकाश जाधव अस हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रकाश जाधव अस आरोपी पतीच नाव आहे.
फ्लॅट घेण्यावरून पती- पत्नीमध्ये दररोज वाद होत होते. घरात आर्थिक चणचण देखील होती. प्रकाश जाधव ची नुकतीच स्कुल बसवरील नोकरी देखील गेली होती. तो घरीच असायचा. मिळालेल्या वेळेत तो रिक्षा चालवायचा. अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. संसाराचा उदरनिर्वाह भागवायचा. परंतु, पत्नी मनीषा आणि प्रकाश जाधव यांच्यात दररोज किरकोळ कारणावरून वाद व्हायचे.
मंगळवारी दुपारी याच रागातून प्रकाश जाधवने पत्नी मनिषाचा घरात कुणी नसताना गळा दाबून हत्या केली. तो तिच्या मृतदेहाचा शेजारी काही वेळ बसून होता. काही वेळाने मोठा मुलगा घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला. काही वेळ दरवाजा उघडलाच नाही. अखेर काही मिनिटांनी दरवाजा उघडण्यात आला.
मनीषा ही बेडवर निपचित पडल्याचं पाहून मुलाने वडील प्रकाश जाधव यांना रुग्णवाहिका बोलावण्यास सांगितली. प्रकाश हा तसाच फरार झाला. मनिषाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. बावधन पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. सोलापूर च्या दिशेने फरार झालेल्या प्रकाश ला काही तासातच अटक करण्यात आली आहे.