पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पुन्हा एकदा अटक होऊ शकते अशी शक्यता जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे त्या प्रश्नावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी मी आणि जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन चर्चा केली होती. कोणी सत्तेत तर कोणी विरोधक असू शकते. आमचं अडीच वर्ष सरकार होते. त्यावेळी सध्याचे सत्ताधारी विरोधी बाकावर होते. आत्ताचे सत्ताधारी म्हणतात की आमच्यातील काही लोकांना अडकविण्याचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. पण मी ३० ते ३२ वर्ष राजकीय जीवनात आहे. मी सत्तेमध्ये असताना त्याचा कधीच गैरवापर करून कोणालाही जाणीवपुर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही ” असं सांगत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना त्यांनी टोला लगावला.

केंद्राचं बजेट हे चुनावी जूमला असल्यासारखं – अजित पवार

केंद्र सरकारचे बजेट सादर झालं आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, देशातील अनेक राज्याच्या निवडणुका लवकरच होणार आहे. त्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे बजेट सादर केले आहे. केंद्राचं बजेट हे चुनावी जूमला असल्यासारखं वाटत असल्याचं त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्या चॅनेलने नोकिया वापरयाचं ठरवलं तर? – अजित पवार

अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे ठाकरे गटाने सर्व नेत्यांना आयफोन वापरण्याचे आदेश दिले आहेत या माहिती पुढे येत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, जर तुमच्या चॅनेलने नोकिया वापरयाचं ठरविले तर तो तुमचा अधिकार आहे. शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. तो निर्णय त्यांनी घेतला असून त्यावर आपण वेळ घालून उपयोग नसल्याचे त्यांनी सांगितले.