पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे ९ आमदारासह २ जुलै रोजी सहभागी झाले. त्यानंतर राज्यात होणार्‍या अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्याकडून आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा-अजित पवारांनी शरद पवारांसोबत व्यासपीठावर येणे टाळले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे वसंतदादा शुगर येथील बैठकीला आले आहेत. त्यावेळी आंबेगाव येथील देवदत्त निकम म्हणाले आहेत की, शरद पवार यांनी आंबेगाव येथून निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्यास निश्चित निवडणूक लढविणार आणि लवकरच शरद पवार यांची सभा आंबेगाव येथे आयोजित करणार आहे. हा प्रश्न राज्याचे मंत्री दिलीप यांना विचारला असता वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव येथे पवार साहेबांची सभा झाली तर आनंदाच आहे. ज्यावेळी शरद पवार यांच्या सभेच नियोजन होईल. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मी शरद पवार यांच्या स्वागताला देखील जाईन अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली. तर शरद पवार यांच्या सभेच्या व्यासपीठावर जाणार का? या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर देणे टाळले.