पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील भिडे वाडा स्मारकाच्या बांधकामासाठी हुतात्मा चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. दररोज रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या भागातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक बदल २५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भिडे वाडा स्मारक आहे. या स्मारकाचे काम सुरू करण्यात आले आहे. बांधकाम साहित्य वाहतूक करणारी वाहने, अवजड क्रेन कामानिमित्त ये-जा करणार आहेत. हे काम दररोज रात्री दहानंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडगीळ पुतळामार्गे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक बदलाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चाैकातून (माॅडर्न कॅफे) स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकामार्गे बेलबाग चौक, स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी श्रीकृष्ण चित्रपटगृह रस्त्याने लक्ष्मी रस्त्यावर यावे. बेलबाग चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक बदल नेमके काय?
– हुतात्मा चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल.
– दररोज रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या भागातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार.
– या भागातील वाहतूक बदल २५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार.
– भिडे वाडा स्मारकाचे काम सुरू.
– बांधकाम साहित्य वाहतूक करणारी वाहने, अवजड क्रेन कामानिमित्त ये-जा करणार.
– हे काम दररोज रात्री दहानंतर करण्यात येणार.
– गाडगीळ पुतळामार्गे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार.
पर्यायी मार्ग कसे असतील?
– छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चाैकातून (माॅडर्न कॅफे) स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
– अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकामार्गे बेलबाग चौक, स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी श्रीकृष्ण चित्रपटगृह रस्त्याने लक्ष्मी रस्त्यावर यावे. बेलबाग चौकातून इच्छितस्थळी जावे.