पुणे: यंदाच्या देशाच्या कोणत्या ना कोणात्या भागाला सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, भूस्खलन आदी आपत्तींमुळे २,९२३ जणांना आपला जीव गमवावा लागला. १८.४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ९२,५१९ जनावरांचा मृत्यू झाला आणि ८० हजार ५६३ घरांचे नुकसान झाले. २०२३ मध्ये देशाला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला.

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वरायमेंटने (सीएसई) केलेल्या सर्व्हेक्षणात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. सीएसईने दिलेल्या माहितीनुसार, यंदा एल-निनोमुळे उशिराने मोसमी पाऊस सक्रीय होणे, अतिवृष्टी, पूर, गारपीट, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षभरात देशात २,९२३ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर, अतिवृष्टीमुळे, पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे देशातील १८.४ हेक्टर सुपीक जमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. पूर, दुष्काळी स्थिती आणि भूस्खलनामुळे ९२, ५१९ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर देशभरात ८०,५६३ घरांचे नुकसान झाले आहे.

Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
kudo millets elephants death
‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?
Kishanganj Bihar
Kishanganj : बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने ३ मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, गावात पसरलं घबराटीचं वातावरण
Three died on the spot after speeding car hit container on Phaltan Pandharpur
फलटण पंढरपूर रस्त्यावर बरडजवळ अपघातात तीन ठार
Howrah Fire
Howrah Fire : फटाक्यांच्या आतषबाजीत तीन चिमुकल्यांचा मृत्यू; ठिणगीने सिलिंडर पेटला अन्…; ऐन दिवाळीत गावावर शोककळा!

हेही वाचा… नामदेव शास्त्री म्हणाले, ‘कोणताही देव मोठा नसतो,तर…’

नैसर्गिक आपत्तींचा सर्वांधिक फटका मध्य प्रदेशला बसला. बिहारमध्ये सर्वांत जास्त जिवितहानी झाली. जून ते सप्टेंबर या काळात बिहारमध्ये ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात हिमाचल प्रदेशात ३६५ तर उत्तर प्रदेशात ३४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका गरीब, शेतकरी वर्गाला बसला आहे.

जगाने सामना केला २० मोठ्या आपत्तींचा

ख्रिश्चयन एड, या संस्थेने काउंटिंग द कॉस्ट २०२३ : ए ईयर ऑफ क्लाइमेट ब्रेकडाउन, या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात २०२३मध्ये जगाला २० सर्वांत मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळे आणि जंगलांना लागलेल्या आगींचा १४ देशांना सर्वाधिक फटका बसला. त्यात अमेरिकेतील हवाईमधील जंगलांना लागलेली आग, गुआम, वानुअतु, न्यूझीलंडमध्ये आलेली वादळे, न्यूझीलंड, इटली, लिबिया, पेरु, चिली आणि हैती आदी देशात आलेला महापूर आणि स्पेनमधील दुष्काळ आदींचा समावेश आहे.