बारामती : शहरातील एका इमारतीतील सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले असून, या घटनेने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. सचिन वाघोलीकर आणि त्यांची पत्नी सारिका अशी मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. जामदार रस्त्यावरील खत्री-पवार अपार्टमेंटमध्ये वाघोलीकर दाम्पत्य राहायला होते. सचिन यांचा मित्र शनिवारी सकाळी घरी आला. तेव्हा सदनिकेतील स्वयंपाकघरात सचिन आणि त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली १० हजार किलोंची मिसळ; अजित पवार अन् चंद्रकांत पाटलांनीही मारला ताव, पाहा Video

After cochlear implant surgery included in Mahatma Phule Jan Arogya Yojana Nagpur saw first surgery
महात्मा फुले योजनेतून राज्यातील पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया नागपुरात… दोन वर्षीय चिमुकला…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
BJP worker Murder, Lonavla rural police,
हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड
pune bhaubeej marathi news
पुणे: भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीला जीवदान, अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
minor girl sexualy abused by lover in nagpur
नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक, तसेच अंगुली मुद्रा तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाघोलीकर दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले. वाघोलीकर दाम्पत्यात कौटुंबिक वाद झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणाचा तपास सुरू असून, हा खुनाचा प्रकार आहे की आत्महत्या, याबाबतचे नेमके कारण समजेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.