पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही. मोहोळवर गोळ्या झाडताना आरोपींनी आरडाओरडा करून मारणेचे नाव घेतले होते. गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने मारणेला अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. मारणेच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाने ३ रोजी म्हणणे मांडावे, असे आदेशात म्हटले आहे.

मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणात आतापर्यंत मारणेचा साथीदार विठ्ठल शेलार याच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली आहे. शेलारसह १६ आरोपींची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मारणेने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

हेही वाचा…पुणे : सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूळ तक्रारीत गणेश मारणेचे नाव आरोपी म्हणून नाही. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या अहवालात गणेश मारणेला फरारी असल्याचे म्हटले नव्हते. त्यामुळे त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात यावा, असा युक्तीवाद मारणेच्या वकिलांनी केला. न्यायालयाने मारणेच्या वकिलांचा युक्तीवाद फेटाळला. मोहोळवर गोळ्या झाडताना हल्लेखोरांनी आरडाओरडा केला होता. हल्लेखोरांनी मारणेचे नाव घेतले होते. याप्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी सरकार पक्ष बाजू मांडणार आहे.