पिंपरी- चिंचवड: पवना नदीत वाहून जाणाऱ्या महिलेला पिंपरी- चिंचवड पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक यांनी वाचवलं आहे. मीनाक्षी पारधे असं वाचवण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.

गेल्या काही तासांपासून मावळसह पिंपरी- चिंचवड, पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्री उशिरा शिरगाव ते कासारसाई रोडवरील पवना नदीतुन महिलेचा वाचवा वाचवा असा आवाज ऐकायला येत होता. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तसेच मावळ वन्यजीक रक्षक यांनाही माहिती देण्यात आली. पोलीस आणि मावळ वन्यजीक रक्षकची टीम तातडीने घटनास्थळी पोहचली. काही जण पाण्यात उतरले, घाबरलेल्या महिलेला धीर देऊन त्यांना पवना नदीतून बाहेर काढण्यात आलं. महिला एका झाडाला लटकलेली होती. काही तास त्या झाडाला लटकलेल्या होत्या. नशीब बलवत्तर असल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल आहे. महिलेला बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल आहे