पिंपरी- चिंचवड : चिंचवडच्या काळभोर नगरमधील आदर्श नगर झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे या ठिकाणाहून आज अधिकारी दाखल झाले होते. मात्र, या अधिकाऱ्यांना आदर्श नगर झोपडपट्टीतील नागरिकांनी हुसकावून लावले. झोपडपट्टी पुनर्वसन सर्वेक्षण योग्य पद्धतीने होत नसून स्थानिकांना डावलण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. नागरिकांच्या विरोधामुळे अधिकाऱ्यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६७१ कोटींचा ‘टीडीआर’ घोटाळा; आयुक्तांसह…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी- चिंचवड शहरातील काळभोर नगर या ठिकाणच्या आदर्श नगर झोपडपट्टीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे येथील अधिकारी सर्वेक्षणासाठी आले होते. आदर्शनगर झोपडपट्टीतील शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन त्या अधिकाऱ्यांचा विरोध करत त्यांना हुसकावून लावले आहे. नागरिकांचा रोष बघून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदर्शनगर झोपडपट्टीत २०० ते २५० कुटुंब राहतात. प्रत्येक कुटुंबातील विवाहित दाम्पत्याला घर मिळत नाही, तोपर्यंत आमचा या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध असल्याचं नागरिकांच म्हणणं आहे. गेल्या साठ वर्षांपासून या ठिकाणी नागरिक आहेत. मग, आत्ताच हा प्रकल्प इथे का उभा राहतो आहे. असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत झोपडपट्टीवासीयांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आमचा या प्रकल्पाला विरोध असेल अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी मांडली.