पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १९६८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९२ हजार ८३९ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनावर उपचार घेणार्‍या १६५७ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ७५ हजार १८४ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी १ हजार २४० जण करोनाबाधित रुग्ण आढळले असून १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १ हजार १६३ जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ६६० वर पोहचली आहे.

यांपैकी, ३३ हजार २७२ जण करोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ७५६ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 46 patients died in one day newly found in 1968 aau
First published on: 29-08-2020 at 21:21 IST