पुणे : ‘नवचैतन्य हास्ययोग परिवार ही समाजाला सकारात्मक करणारी आरोग्याची चळवळ आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच हास्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. जगामध्ये १२० देशांत जागतिक हास्यदिन साजरा होत आहे. हास्यामुळे सकारात्मकता येते. सकारात्मक विचारांची माणसे समाजात चांगला बदल घडवतात. मनाने प्रसन्न असणारी माणसे दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच ज्येष्ठांबरोबरच तरुण माणसेही या पद्धतीचा उपयोग करत आहेत,’ असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी व्यक्त केले.

जागतिक हास्ययोग दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे आयोजित विशेष हास्ययोग कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. डॉ. संजय कळमकर यांचे ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यान झाले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जयराज ग्रुपचे राजेश शहा, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका, पितांबरी प्राॅडक्ट्सचे महेश जोशी, किरण दगडे पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार रामचंद्र राऊत, विश्वस्त जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे, दत्तात्रय कुंदेन, ॲड. एकनाथ सुगावकर, सुनील देशपांडे, अतुल सलाग्रे, हरीश पाठक या वेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ‘ताणतणावापासून दूर राहण्यास हास्ययोगाचा उपयोग होतो. एखाद्या चिकित्सेप्रमाणे हास्ययोग काम करत असून, जागतिक स्तरावर याला मान्यता आहे. पुण्यातील ही चळवळ नागपुरातही सुरू व्हावी.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहा म्हणाले, ‘आगामी काळात एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून पुण्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा उपक्रम राबवणार आहोत. अधिकाधिक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. देसाई रुग्णालयात मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येईल.’