पुणे : पाषाण-सूस रस्त्यावर झालेल्या अपघातात मोटारचालक संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोटारचालक संगणक अभियंता तरुणीचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. कीर्ती कृष्णा माळवे (वय ४०, रा. इस्टीका सोसायटी, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या संगणक अभियंता तरुणीचे नाव आहे. अपघातात मोटारचालक अभिक चॅटर्जी (वय २४, रा. पाषाण-सूस रस्ता) जखमी झाले आहेत.

हेही वाचा : खळबळजनक: पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या

Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

कीर्ती एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होत्या. चॅटर्जी एका व्यायामशाळेत प्रशिक्षक आहेत. मोटारचालक कीर्ती रात्री नऊच्या सुमारास पाषाण-सूस रस्त्याने निघाल्या होत्या. वरदायिनी सोसायटीसमोर मोटारचालक कीर्ती यांचे नियंत्रण सुटले. तेथून मोटारचालक चॅटर्जी निघाले होते. चॅटर्जी यांच्या मोटारीवर पाठीमागून भरधाव मोटार आदळली. अपघातात मोटारचालक कीर्ती गंभीर जखमी झाल्या. मोटारचालक चॅटर्जी जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेतील कीर्ती यांना खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी दिली. उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.