पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात (आचार्य आनंदऋषीजी चौक) मेट्रो मार्गिका, तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई, ठाण्याकडे जाणाऱ्या शिवनेरी बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर मंगळवारपासून (२० फेब्रुवारी) पुढील आदेश येईपर्यंत सकाळी आठ ते रात्री साडेआठपर्यंत वेधशाळा चौकातून गणेशखिंड रस्ता, विद्यापीठ चौक, औंधमार्गे मुंबईकडे ये-जा करणाऱ्या शिवनेरी बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

हेही वाचा…पुणे : मार्केट यार्डात ट्रक चालकाला चाकूच्या धाकाने लूटणारा गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत सकाळी आठ ते रात्री साडेआठ यावेळेत शिवनेरी बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. गणेशखिंड रस्त्यावरील रेंजहिल्स कॉर्नर येथून उजवीकडे वळून साई चौक, डॉ. आंबेडकर चौक, खडकी, ब्रेमेन चौकातून औंध रस्ता या मार्गाने शिवनेरी बस मुंबईकडे जातील. पुण्याकडे येणाऱ्या शिवनेरी बस ब्रेमेन चौकातून खडकी, रेंजहिल्स कॉर्नरमार्गे पुण्याकडे येतील.