पुणे : वरळी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जागांबाबत राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यानंतर अनेक राजकीय नेते मंडळीकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्या, त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

महायुतीला मिळालेल्या यशाबाबत राज ठाकरे यांनी काल अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यावर तुमची चर्चा झाली का? त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आम्ही दोघेजण (राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे) कार्यक्रमासाठी एकत्रित आलो आहोत’ आमच्या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमची काल माजी आमदार रविंद्र धंगेकर आणि माजी महादेव बाबर यांनी भेट घेतली. यामुळे हे दोघे जण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. त्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘आम्ही जेव्हापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले.तेव्हापासून पक्ष प्रवेशाचा ओघ सुरूच आहे’. राज्यातील अनेक भागातील नेते पक्षात प्रवेश करीत आहेत. त्याच बरोबर मी उपमुख्यमंत्री, नगरविकासमंत्री आहे. त्यामुळे मला कोणी ही येऊन भेटू शकत असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली. रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले, पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, तुम्ही काही काळजी करू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली.