पुणे : लष्कर भागातील कटक मंडळाच्या प्रशासकीय इमारतीतील गच्चीवर एक जण मृतावस्थेत सापडला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. राजीव उर्फ बाबा तेलंग (वय ५०) असे मृतावस्थेत सापडलेल्या नाव आहे. तेलंग यांना दारु पिण्याचे व्यसन आहे. ते दारुच्या नशेत कटक मंडळाच्या आवारात असलेल्या प्रशासकीय विभागातील इमारतीत शिरले. गच्चीत एक जण मृतावस्थेत पडल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा : पिंपरी विधानसभा: अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडेंना महायुतीमधून विरोध; १८ माजी नगरसेवकांचा ठराव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोेलिसांनी तपास करुन मृतदेहाची ओळख पटविली. तेलंग फिरस्ते आहेत. त्यांना एक बहीण आहे. प्राथमिक चौकशीत त्यांचा मृत्य नैसर्गिक झाल्याची शक्यता आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, अशी माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.