पुणे : संवाद पुणे, हाउस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या वतीने उद्यापासून ‘कला आणि करिअर’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमांतर्गत होणारी ही सत्रे उद्या (शुक्रवार) ते रविवार या कालाधीत बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात होणार आहेत. प्रदर्शन आणि मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून ही सत्रे होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘या महोत्सवाचे उद्घाटन उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. तालयोगी पं. सुरेश तळवलकर, नृत्यगुरू सुचेता चाफेकर, भारती विद्यापीठाचे कुलसचिव जे. जयकुमार उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे,’ अशी माहिती सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, शारंगधर साठे, प्रदीप तुपे, सुनील रेडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शमा भाटे, स्मिता महाजन, डॉ. विकास कशाळकर, समर नखाते, कौशल इनामदार, राजेंद्र कुलकर्णी, अभिराम भडकमकर, अमित वझे, गजानन परांजपे, किरण यज्ञोपवित, डॉ. अरविंद शाळिग्राम, चंद्रमोहन कुलकर्णी, डॉ. संजय तांबट, चारुहास पंडित, बाळ पाटील, डॉ. सुनील भिरूड, अमेय पांगारकर, डॉ. मीनाक्षी अत्रे, गणेश भगत, सचिन पवार, प्रसाद नामजोशी, गीतांजली कुलकर्णी, क्षितिज यादव, सचिन सोनवणे, डॉ. अनुपमा पाटील, प्रा. राधाकृष्ण पाटील हे सहभागी होणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे.