पुणे : सर्व धर्मांचे मूळ शाश्वत धर्म, मानव धर्म आहे. विश्वशांतीची घोषणा करून विश्वशांतीची आम्हाला शिकवण देऊन जगात वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न होत आहे. युद्ध थांबत नाही, अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात. अल्पसंख्यांकांची दशा काय हे त्यांनी पाहिले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली.

हिंदू अध्यात्मिक सेवा संस्था, शिक्षण प्रसारक मंडळी यांच्यातर्फे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हिंदू सेवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात भागवत बोलत होते. रामजन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी, महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, लाभेश मुनी, गौरांग प्रभू, हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा या वेळी उपस्थित होते.

हे ही वाचा… केळ्यांसाठी शाळांना मिळणार अनुदान… काय करावे लागणार?

भागवत म्हणाले, बाहेरचे लोक येऊन सेवा करतात असाच आजपर्यंतचा समज होता. पण सनातन धर्मपंथांचे लोकही सेवा करतात. त्याची प्रसिद्धी कधी झाली नाही. ज्यांना चांगले व्हायचे असते ते दिखावा न करता चांगले होतात. बाहेरून आलेल्यांनी देशावर राज्य केले. त्यातून आपण आपला इतिहास विसरलो. अशा वेळी आता आपण वाचले पाहिजे, शिकले पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दाखवण्याची, आपली शस्त्र दाखवण्याची गरज आहे. जग हे उपभोगाची वस्तू नाही. आजच्या काळात व्यक्तिवादाचा अतिरेक झाला आहे. मी, माझे करिअर असा विचार केला जातो. पण त्याचा अतिरेक होता कामा नये. समाज, कुटुंब, सृष्टीचा विचार केला पाहिजे. सेवा कार्यात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे.

हे ही वाचा… पुणे शहरात पादचारी भयभीत, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; ११ महिन्यांत पादचाऱ्यांना लुबाडल्याच्या १६७ घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटेंगे तो कटेंगे

हिंदू या शब्दाशी तडजोड होता कामा नये. हा एकच शब्द तारणारा आहे. आजवर सेवा करून त्याची कधी जाहिरात केली नाही. मात्र आजचा काळ वेगळा आहे. आपले काम एकत्रितपणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. जातीपातींतून बाहेर येऊन हिंदू म्हणून देशाची सेवा केली पाहिजे. बटेंगे तो कटेंगे तो कळते, तसेच घटेंगे तो कटेंगे हेही लक्षात घेण्याची गरज आहे. देशाला समर्थ करण्यासाठी हिंदूंना समर्थ व्हावे लागेल, असे गोविंददेव गिरी म्हणाले.