पुणे शहरातील हडपसर भागात राहणार्‍या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून,तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे हडपसर भागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी तनुज माकीन (रा. जबलपूर, मध्य प्रदेश) याच्या विरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तनुज या दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती.पीडित तरुणी आणि आरोपी तनुजची सुरुवातीला मैत्री झाली. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.त्याच दरम्यान आरोपी तनुजने पीडित तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.त्या पीडित तरुणीने काही दिवसांनी आरोपी तनुज कडे लग्न करण्याबाबत विचारले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि माझा नाद सोड नाही तर तुझ्यासह कुटुंबातील सर्वाना जिवे मारेल अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर अखेर त्या पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकारा बाबत हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून तनुज माकीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.