पुणे : पत्नीचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून भूमकर पुलापासून जाणाऱ्या आरोपी पतीला गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी हटकलं अन् त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून खून केल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बबीता निसार असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर राकेश निसार असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भूमकर पुल परिसरात नेहमीप्रमाणे आमचे पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी एक दुचाकी चालक येत येत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण तो कोणत्याही प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला.अखेर त्याने पत्नीचा रागाच्या भरात गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वामी नारायण मंदिराच्या दिशेने जात होतो असे त्याने सांगितले. या आरोपीला अटक करण्यात आली असून कोणत्या कारणास्तव खून केला आहे याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.