पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शहर संघटनेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. शहराध्यक्ष प्रशांत जगताप हडपसरचे उमेदवार असल्याने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी प्रभारी म्हणून ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांच्याकडे देण्यता आली आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शहर समन्वय समितीची बैठक पक्ष कार्यालयात झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने काही आवश्यक नियुक्त्याही यावेळी करण्यात आल्या. माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के, बापूसाहेब पठारे, विशाल तांबे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : दिवाळीत चितळे बंधू मिठाई विक्री दुकानात चोरी, गल्ल्यातील दीड लाखांची रोकड लंपास

u

शहराध्यक्ष प्रशांत जगताप हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन त्यांची जबाबदारी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक विशाल तांबे यांची शहर मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या वीतने निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून ही व्यवस्था विधानसभा निवडणूक होई पर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.